गावाचे ऐतिहासिक / भौगोलिक महत्व
धरणाची मुख्य माहिती ()
• उद्दिष्ट:सिंचन आणि जलविद्युत उत्पादन जलप्रपाताची उंची : ३५ मी.
जास्तीत जास्त विसर्ग : १२.६३ क्यूमेक्स निर्मिती क्षमता : ३ मेगा वॅट विद्युत जनित्र : १
• नदी : कादवा नदी
• स्थान : करंजवण गाव, दिंडोरी तालुका, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र
• बांधकाम काळ:१९६८-१९७४ क्षमता:१७३.३ दशलक्ष घनमीटर
तेथुन निफाड, येवला, नांदगाव येथे सिंचना करीता पाणी पुरवठा होतो. त्याच प्रमाणे वन हद्दीत देऊळदरा येथे प्राचिन कालीन महादेवाचे जागृत देवस्थान आहे त्या ठिकाणी मा. खासदार भास्कर भगरे यांच्या विशेष पर्यत्नातुन पेव्हर ब्लॉक व लोखंडी पुल बांधकाम करण्यात आला आहे. हे धरण नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांपैकी एक आहे, जे परिसरातील सिंचनासाठी पाणी पुरवते.
ग्रामपंचायतीच्या विकास कामांबाबत प्रशंसा
यशोगाथा
ग्रामपंचायतीचे विकासदृष्टीकोन आणि आर्थिक नियोजन
ग्रामपंचायतीकडे उत्पन्न अत्यल्प असतानाही काटकसरी आणि योग्य नियोजनातून २३ लाख रुपये बचत करून नवीन ग्रामपंचायत इमारत बांधण्यात आली. तसेच १४ वित्त आयोग निधीतून सभोवतालच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले. व्यापारी गाळे उभारणीमध्येही ग्रामपंचायतीने प्रभावी नियोजन केले असून, अंदाजे १८ गाळे मंजूर असूनही प्रत्यक्षात २३ गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. गावात अंतविधीच्या सुविधेसाठी आर.सी.सी. अमरधाम, जलसंधारणासाठी सिमेंट बंधारे, पाणी ए.टी.एम., ट्रॅक्टर खरेदी, आणि विविध शासकीय योजनांतून सीएसआर निधीच्या सहाय्याने अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवले गेले आहेत.
समाजघटक विकास, आरोग्य व शैक्षणिक सुविधा
करंजवण ग्रामपंचायतीने अनुसूचित जाती, नवबौद्ध घटक, व आदिवासी वस्तीतील नागरिकांसाठी भरीव विकासकामे केली आहेत. पंचशील नगर, अण्णा साठे नगर, इंदिरा कॉलनी आदी वस्त्यांमध्ये १००% भुमिगत गटारी, कॉक्रीट रस्ते, एलईडी लाईट्स, स्वतंत्र शौचालये आणि डिजिटल शिक्षणासाठी टीव्ही देण्यात आले आहेत. आदिवासी वस्तीतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण “ठक्कर बाप्पा योजनेतून” करण्यात आले आहे. करंजवण येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाल्याने आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे. गावात अँम्बुलन्स आणि वैकुंठ रथ देखील उपलब्ध आहेत. याशिवाय, धार्मिक पर्यटनस्थळाच्या विकासासाठी पायऱ्या, लोखंडी पूल व पेव्हर ब्लॉकचे काम तिर्थक्षेत्र विकास निधीतून प्रगतीपथावर आहे.
स्वच्छता, पाणीपुरवठा व पर्यावरण संवर्धनात आदर्श
करंजवण हे दिंडोरी तालुक्यातील एक आदिवासी भागातील गाव असून सुमारे ४ हजार लोकसंख्या असलेले आहे. गावाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १००% हागणदारीमुक्ततेचा टप्पा पार केला आहे. जलसंपदा विभागाची पाणीपुरवठा विहीर ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली असून ६१६ विशेष नळ कनेक्शनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. जल जीवन मिशन अंतर्गत नवीन योजना प्रगतीपथावर आहे. पर्यावरण संवर्धनासाठी गावाने तब्बल २२,५०० वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन केले असून, ही एक राज्यपातळीवरील मोठी कामगिरी ठरली आहे. गावातील भुमिगत गटारी, कॉक्रीट रस्ते, पेव्हर ब्लॉक बसवलेले प्रशस्त पटांगण इत्यादी कामे देखील प्रभावीपणे पार पाडली आहेत.
कर्मचारी वर्ग
• ग्रामपंचायतीचे विकास कामे
प्रमुख पिके
स्ट्रिट लाईट
गावं अंतर्गत रस्ते
युवक मंडळ
पोलीस स्टेशन
अंगणवाड्या इमारती
भजनी मंडळ
१. गावातील खदानी बुजविणे
करंजवण धरण बांधकामाचे वेळी गावात मोठ्या प्रमाणावर खदाणीचे खोदकाम करून माती उपण्याचे काम केले होते. परंतु सदरच्या खदानीतील पाण्यामुळे गावात रोगराई पसरत होती. परंतु ग्रामपंचायतीने योग्य नियोजन करून चार खदानी बुजवुन जागा लेवल करून सार्व. उपक्रमाकरीता जागा उपयोगात आनली.
२. वृक्ष लागवड
ग्रामपंचायती मार्फत व म.ग्रा.रो.ह.यो अंतर्गत रस्ते दुतर्फा ३ कि.मी, पडीक जागेत तसेच प्रत्येक शेतक-याच्या बांधावर सर्वाधिक २२५०० वृक्ष लागवड करून यशस्वी संगोपन केल्याने महाराष्ट्र शासनाने पर्यावरण ग्राम समृध्दी योजनेत सलग ३ वर्ष निवड करून रू. ८ लाख पारितोषिक दिले आहे.
३. सि.एस. आर. निधी
- ग्रामपंचायतीने पाटपुरवा करून परनॉल्ड रिकार्ड कं. कडून पुढील विकास कामांकरीता सि.एस.आर निधी प्राप्त करून घेतला आहे.
- ) जिल्हा परिषद शाळा आर.सी.सी. इमारत व स्वच्छता गृह – १. १० कोटी
आ) घन कचरा संकलन करीता ट्रँक्टर खरेदी – ८ लाख
इ. ) जिल्हा परिषद शाळा कंपाऊंड – २२ लाख
ई.) देऊळदरा वन हद्दीत वृक्ष लागवड / सिमेन्ट बंधारा – २० लाख
उ.) वॉटर ए.टी.एम संयत्र – ४ लाख
४. पाणी पुरवठा सुविधा
उशाशी धरण असतांनाही दर वर्षी मार्च नंतर पाणी टंचाई भेडसावत होती परंतु ग्रामपंचायतीने पाट पुरावा करून राष्ट्रीय पेयजल पाणी पुरवठा योजनेतुन रू. ८० लाख निधी मंजुर करून काट कसरीच्या नियोजनातुन गावात सन – २०१४/१५ वर्षात नळ पाणी पुरवठा योजना मंजुर करून १०० % घरोघर स्पेशल नळाव्दारे पाणी पुरवठा केला जातो. याशिवाय ग्रामपंचायतीने करंजवण पाठ बंधारे विभागाची पडीक पाणी पुरवठा विहीर मंत्रालय स्थरावर पाठ पुरावा करून रू ३५८२५० /- रक्कम लोक वर्गणीतुन ग्रामपंचायतीकडे कायम स्वरूपी हस्तांतर करून घेतली. तसेच जन जिवन मिशन सन – २०२१ / २२ मध्ये रूपये – ५२६५३३४ रक्कमेची योजना मंजुर झालेली असुन सदर योजनेतुन पाणी पुरवठा विहीरी पासुन ते गावातील नविन उंट पाण्याची टाकी पर्यंत पाईप लाईन व नविन पाण्याची उंच टाकी ८५००० /- लि व वितरण व्यवस्था व पंप्पींग मशिनरी या योजनेतुन करण्यात आल्या.
५. स्माशान भुमी सुविधा :
गावात अंतविधी करीता करंजवण गावात पुरेशी जागा उपलब्ध नव्हती परंतु ग्रामपंचायतीने पडीक नाल्यालगत आर.सी.सी भिंत बांधुन मोठ्या प्रमाणावर मुरूमाचा भराव करून डबल बेडचे आर.सी.सी प्रशस्त अमरधाम बांधकाम व वृक्ष लागवड करून पाणी पुरवठा सुविधा करण्यात आली.
व्यापारी गाळे बांधकाम
ग्रामपंचायतीने उत्पन्न अत्यंल्प असल्याने ग्रामपंचायतीने ३१ व्यापारी गाळ्यांचे बांधकाम केले आहे. सन – १८/१९ वर्षात ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतुन ३० लाख कर्ज घेवुन १८ गाळे अंदाजपत्रकानुसार मंजुर करण्यात आले. परंतु ग्रामपंचायतीने काटकसरी धोरणातुन १८ ऐवजी २३ गाळे बांधकाम करून पाच गाळ्यांचे जादा बांधकाम केलेले आहे.
भुमिगत गटारी
गावात जवळपास ग्रामपंचायतीने योग्य नियोजन करून ९० % भुमिगत गटारी ( ७२१० मि.) बांधकाम करून कमी खर्चात सांडपाण्याचे नियोजन केले आहे.विशेष बाब म्हणजे या कामावर गेल्या पाच ते सहा वर्षापासुन देखभाल दुरूस्ती खर्च हा ० आहे.
सभामंडप
मा. उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधान सभा सदस्य यांच्या प्रयत्नातुन दोन सभा मंडप मंजुर करण्यात आले. या सभागृहामुळे अनु.जाती / जमाती प्रवर्गातील नागरिकांचे तसेच गरिब कुटूंबाचे विवाह व इतर समारभा कामी त्याचा उपयोग होत आहे.
अनु. जाती व नव बौध्द घटक सुधार योजना
या अंतर्गत तीन वस्त्या असुन तीनही वस्त्या मध्ये १०० % भुमिगत गटारी व कॉक्रीट रस्ते तयार करण्यात आले. सन – २०२० /२१ वर्षात या वस्ती करीता स्वतंत्र आर.सी.सी. पाण्याची टाकी मंजुर करण्यात आली. तसेच राजवाडा क्रिडांगण येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले असुन शेजारील पडीक जागेत क्रिडा विभागातुन ग्रीन जिम बसविण्यात आलेली आहे.
पेसा निधी
या योजनेतुन ग्रामपंचायतीस दर वर्षी सरासरी रू. ९३१४३१ इतका निधी प्राप्त होतो. त्यातुन आदिवासी वस्तीत भुमिगत गटारी , कॉक्रीट रस्ते , स्ट्रिट लाईट सुविधा , वन हद्दीत वृक्ष लागवड, शालेय मुलांना ई – लर्णीग उपक्रम राबविण्यात आलेला आहे. विशेष बाब ग्रामकोष समिती मार्फत ६७ वैयक्तीक व हक्क दावे शासनाकडे सादर करून मंजुरी प्राप्त करून घेतली व देऊळदरा वन हद्दीत सार्वजनिक तिर्थेक्षेत्र असल्याने ग्रामपंचायीतने सुमारे ४७ हेक्टर वन विभागाकडील जमिन वन उपज उत्पादन करीता ग्रामपंचायत करंजवण वन हक्क समिती कडे वर्ग करून घेतली.
ग्रामपंचायत प्रशासन भवन
ग्रामपंचायतचे आर्थीक उत्पन्न नसतांना ग्रामपंचायतीने योग्य नियोजन करून आमदार निधी – १० लाख, खासदार निधी – १० लाख, अंगणवाडी बांधकाम – ६.५० लाख, जनसुविधा – १२ लाख असे बहुविध निधीतुन प्रशस्त ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम करण्यात आली. विशेष बाब या इमारतीस साधारणता रूपये २३ लाख वाढीव खर्च हा ग्रामपंचायतीने विविध विकास कामे योग्य रीतीने करून त्यातुन झालेल्या बचतीच्या माध्यमातुन सदरची नाविन्य पुर्ण इमारत बांधकाम करण्यात आली. तसेच इमारती सभोवतालचा परिसरात प्रशस्त पेविंग ब्लॉक बसवुन प्रशस्त पटांगण १४ वित्त आयोग निधीतुन पुर्ण केले.
वैयक्तीक लाभाच्या योजना
ग्रामपंचायीतने इंदिरा आवास घरकुले, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना , पंतप्रधान आवास, मोदी आवास योजना या अंतर्गत बेघरांना घरकुले मंजुर केली आहे. याशिवाय सिचन विहीरी, पाईप लाईन, बचत गटासाठी अनुदाने, दिव्यांगासाठी योजना, निराश्रीत महिलांना अनुदान योजना , जनावरांसाठी गोठे, शेतक-यासाठी शेततळे बांधकाम केली आहे.
ग्रामपंचायतीच्या विकास कामांबाबत प्रशंसा
ग्रामपंचायतीने योग्य नियोजनातुन केलेल्या भुमिगत गटारी, वृक्ष लागवड, पाणी पुरवठा, रस्ते कॉक्रीट करण, ग्रामपंचायत भवन व इतर विविध विकास कामां बाबत तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. रणजिंत कुमार, मा.श्री. दिपक कुमार मिना, मा.श्री. नरेश गिते तसेच मा. प्रांत अधिकारी, मा. तहसिलदार, मा. गटविकास अधिकारी, यांनी ग्रामपंचायतीस भेटी देवुन विविध विकास कामां बाबत प्रशंसा केली आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब, मा. खासदार श्री. हरिशचंद्र चव्हाण, खासदार सौ. भारतीताई पवार, मा. आमदार श्री. धनराज महाले मा. आमदार श्री. रामदास चारोस्कर, कादवा सहकारी साखर कारखाना चेअरमन मा. श्री. श्रीराम शेटे, पंचायत समिती सभापती, उपसभापती यांनी देखील ग्रामपंचायतीचे विविध विकास कामांना भेटी देवुन प्रशंसा केली आहे.
तसेच विषेश बाब अशी की



































