दिंडोरी तालुक्यातील ग्रामपंचायत करंजवण यांनी आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना 2022 – 2023 योजनेत भाग घेवुन ग्रामपंचायतचे आर्थीक उत्पन्न नसतांना ग्रामपंचायतीने योग्य नियोजन करून आमदार निधी – १० लाख, खासदार निधी – १० लाख, अंगणवाडी बांधकाम – ६.५० लाख, जनसुविधा – १२ लाख असे बहुविध निधीतुन प्रशस्त ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम करण्यात आली. विशेष बाब या इमारतीस साधारणता रूपये २३ लाख वाढीव खर्च हा ग्रामपंचायतीने विविध विकास कामे योग्य रीतीने करून त्यातुन झालेल्या बचतीच्या माध्यमातुन सदरची नाविन्य पुर्ण इमारत बांधकाम करण्यात आली. तसेच इमारती सभोवतालचा परिसरात प्रशस्त पेविंग ब्लॉक बसवुन प्रशस्त पटांगण १४ वित्त आयोग निधीतुन पुर्ण केले. ग्रामपंचायतीने योग्य नियोजनातुन केलेल्या भुमिगत गटारी, वृक्ष लागवड, पाणी पुरवठा, रस्ते कॉक्रीट करण, ग्रामपंचायत भवन व इतर विविध विकास कामे केलेली आहेत. गावाने योग्य नियोजनातुन विकास कामे केल्याने दिंडोरी तालुक्यातुन करंजवण हे गाव आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना 2022 – 2023 योजनेत प्रथम आल्याने नाशिक जिल्हाचे पालक मंत्री श्री. दादाजी भुसे मंत्री, बंदरे आणि खनिकर्म, महाराष्ट्र शासन, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे शुभहस्ते करंजवण गावाला  १० लाख रूपयाचे प्रथम बक्षिस व सन्मानपत्र वितरण करण्यात आले.  बक्षिस वितरण वेळी करंजवण गावचे सरपंच श्री. संदिप माधवराव गांगोडे व उपसरपंच श्री. रंगनाथ राजाराम बर्डे सदस्य श्री. शंकर राजाराम वासले सदस्य श्री. शहाणराव शंकर खराटे श्री. प्रकाश लक्ष्मण देशमुख , श्री. प्रविण देवराम गांगोडे, सौ. मनिषा सुरेश कोंड, सौ. सुनिता भास्कर भालेराव, सौ. रेखा सुनिल कोंड, कु. पुनम रामनाथ खराटे, सौ. सरला पंढरीनाथ खराटे सौ. हिराबाई रंगनाथ गांगोडे व ग्रामविकास अधिकारी श्री. सुभाष हरी गायकवाड हे उपस्थित होते.